राष्ट्रपतींच्या दाैऱ्यामुळे स्वीकृतसाठी मुदतवाढ, आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्जांची संधी
Deadline for approval extended due to President's visit, applications now open until November 4
राष्ट्रपतींच्या दाैऱ्यामुळे स्वीकृतसाठी मुदतवाढ, आता ४ नोव्हेंबरपर्यंत अर्जांची संधी


भाजपच्या सहा जागांसाठी सोशल मीडियावर १६ नावांची चर्चा

यादीत स्थान न मिळालेल्या इच्छुकांचा शहराध्यक्षांवर प्रश्नांचा भडिमार

नाशिक, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीच्या प्रक्रियेला आता सिंहस्थ ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामुळे मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुकांनी २१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज आणि शिफारसपत्रे सादर करावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले होते. मात्र, ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा होणार असल्याने महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत आता ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया गेल्या नऊ महिन्यांपासून रखडली आहे. उच्च न्यायालयाने ही प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. आता मुदतवाढीमुळे इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी अधिक वेळ मिळाला असला, तरी न्यायालयीन निर्देशांच्या पार्श्वभूमीवर पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

-- ---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande