उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस ट्रॉली पलटी; जीवितहानी टळली
लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची रिंग मोडल्याने टायर फुटून ट्रॉली पलटी झाल्याची घटना उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. ट्रॉली ऊसाने भरलेली असल्याने संपूर्ण ऊस रस्त्यावर विखुरला गेला. च
अपघात


लातूर, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।

साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची रिंग मोडल्याने टायर फुटून ट्रॉली पलटी झाल्याची घटना उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली.

ट्रॉली ऊसाने भरलेली असल्याने संपूर्ण ऊस रस्त्यावर विखुरला गेला. चौक हा शहरातील मुख्य वर्दळीचा असल्याने घटनेनंतर बराच वेळ वाहतूक खोळंबली होती, आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

सुदैवाची बाब म्हणजे या भीषण वाटणाऱ्या अपघातात ट्रॅक्टर चालकासह कोणीही जखमी झाले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुन्हा असे प्रकार होऊ नयेत म्हणून शहरातून अवजड वाहनावर बंदी आणावी अशी मागणी केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande