नांदेड - विभागीय वादविवाद स्पर्धेत ब्लू बेल्स शाळेला सहाव्यांदा जेतेपद
नांदेड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। नांदेड येथील ज्ञानमाता विद्या विहार येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित अशा १९ व्या फादर पीटर मर्मियर वादविवाद स्पर्धेत येथील नामांकित ब्लू बेल्स शाळेने सर्वोत्कृष्ठ शाळा हा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे ब्लू बेल्स
E


नांदेड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)।

नांदेड येथील ज्ञानमाता विद्या विहार येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित अशा १९ व्या फादर पीटर मर्मियर वादविवाद स्पर्धेत येथील नामांकित ब्लू बेल्स शाळेने सर्वोत्कृष्ठ शाळा हा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे ब्लू बेल्स शाळेने सलग तिसऱ्यांदा आणि एकूण सहाव्यांदा हा बहुमान मिळवून स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवला.

एआय च्या युगात माहितीपेक्षा मानवी सर्जनशीलता अधिक महत्वाची आहे या विषयावर पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण विभागातून एकूण १७ शाळेनी सहभाग नोंदवला होता. यात ब्लू बेल्स शाळेची कु. ख़ुशी पवार हिने विषयाच्या बाजूने बोलत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून बहुमान मिळविला. तसेच या शाळेची कु. ख़ुशी भवरे हिने विषयाच्या विरुद्ध बाजूने आपले परखड मत मांडले तर समृद्धी पाटील हिने उत्कृष्टरित्या इंटरजेक्टरची भूमिका निभावली.' सर्वोत्कृष्ट वक्ता ' म्हणून कु. ख़ुशी पवार हिला ५,००० रु. रोख व प्रमाणपत्र आणि सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

या यशस्वी विद्यार्थिनीचे मार्गदर्शक शिक्षिका सौ. वर्षा पाटील यांच्यासह केशवराव पाटील चव्हाण, हणमंतराव पाटील चव्हाण, खासदार रविंद्र पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, विजय पाटील चव्हाण, आदी शाळेतील शिक्षकांवृंदानी अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande