
बीड, 22 ऑक्टोबर, (हिं.स.)। बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती, जनसहभाग आणि प्रभावी अंमलबजावणीच्या उद्देशाने जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, बीड यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालविवाहामुळे बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेवर परिणाम होतो. त्याचे उच्चाटन करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच समाजात जागरूकता वाढवावी, यावर प्रशिक्षणातून भर देण्यात आला. प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी मिळावी आणि त्याचे बालपण सुरक्षित राहावे, हा संदेश यावेळी देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis