नायगावमध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
नांदेड, २२ ऑक्टोबर (हिं.स.) : नायगाव शहरातील छत्रपती शाहू महाराज नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपनगराध्यक्ष विजय शंकरराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त आयोजित भीमगीतांच्या का
ठ


नांदेड, २२ ऑक्टोबर (हिं.स.) : नायगाव शहरातील छत्रपती शाहू महाराज नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपनगराध्यक्ष विजय शंकरराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त आयोजित भीमगीतांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष विजय चव्हाण होते. यावेळी नगराध्यक्ष प्रा. संजय चव्हाण, नगरसेवक विठ्ठल बेळगे, नगरसेविका सुमनबाई भीमराव सोनकांबळे आणि युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक पाटील चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

शुद्धोधन कदम यांच्या संगीत रजनीअंतर्गत भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या भीमगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पंकज पाटील चव्हाण, विराज पाटील चव्हाण आणि सूरज आप्पा बेळगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते..याशिवाय नगरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande