पाणीटंचाई : वर्धा नदीच्या डोहातील पाणी पातळी अवघ्या १० फुटांवर
अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। शहराचा मुख्य पाणीस्रोत असलेल्या वर्धा नदीतील चांदूर ढोरे येथील डोहाची पाणी पातळी अवघ्या १० फुटांपर्यंत खाली घसरली आहे. यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे जलस्रोत कोरडे पडू लागले असून, तिवसा शहरावर गंभीर पाणीटंचाईचे सावट पस
पाणीटंचाईचे सावट: वर्धा नदीच्या डोहातील पाणी पातळी अवघ्या १० फुटांवर, तिवसावासी संकटातविदर्भ प्रजासत्ताकदि.२२तिवसा: ६ शहराचा मुख्य पाणीस्रोत असलेल्या वर्धा नदीतील चांदूर ढोरे येथील डोहाची पाणी पातळी अवघ्या १० फुटांपर्यंत खाली घसरली आहे. यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे जलस्रोत कोरडे पडू लागले असून, तिवसा शहरावर गंभीर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे.सध्या शहरात १७ प्रभागांमध्ये दर चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र, नदीतील घटती पातळी आणि अधिग्रहित केलेल्या तीनपैकी एका विहिरीचे पाणी बंद पडल्यामुळे हा पुरवठा आता ८ ते १० दिवसांवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या या डोहाची खोली २५ फुटांपर्यंत आहे; मात्र सध्या पाणी पातळी घटल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.या परिस्थितीमुळे नागरिकांना २०१९ च्या भीषण दुष्काळाची आठवण होत आहे. त्यावेळी जलसंकट दूर करण्यासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी नलदमयंती सागरातून नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले होते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.प्रशासनाकडून टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात नवीन बोअरवेल, ५ पाण्याचे टँकर आणि ५ नवीन विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच भूजल सर्वेक्षण विभागाकडून शहरातील ६५ विहिरींचा अहवाल मागवला असून डोहातील उपलब्ध पाण्याचे नियोजन केले जात आहे. ऐन उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई उग्र रूप धारण करत असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी तिवसावासीयांकडून केली जात आहे.


अमरावती, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। शहराचा मुख्य पाणीस्रोत असलेल्या वर्धा नदीतील चांदूर ढोरे येथील डोहाची पाणी पातळी अवघ्या १० फुटांपर्यंत खाली घसरली आहे. यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे जलस्रोत कोरडे पडू लागले असून, तिवसा शहरावर गंभीर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे.

सध्या शहरात १७ प्रभागांमध्ये दर चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र, नदीतील घटती पातळी आणि अधिग्रहित केलेल्या तीनपैकी एका विहिरीचे पाणी बंद पडल्यामुळे हा पुरवठा आता ८ ते १० दिवसांवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरापासून १२ किमी अंतरावर असलेल्या या डोहाची खोली २५ फुटांपर्यंत आहे; मात्र सध्या पाणी पातळी घटल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

या परिस्थितीमुळे नागरिकांना २०१९ च्या भीषण दुष्काळाची आठवण होत आहे. त्यावेळी जलसंकट दूर करण्यासाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी नलदमयंती सागरातून नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले होते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.प्रशासनाकडून टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शिवदास मुसळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात नवीन बोअरवेल, ५ पाण्याचे टँकर आणि ५ नवीन विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच भूजल सर्वेक्षण विभागाकडून शहरातील ६५ विहिरींचा अहवाल मागवला असून डोहातील उपलब्ध पाण्याचे नियोजन केले जात आहे. ऐन उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई उग्र रूप धारण करत असल्याने प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी तिवसावासीयांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande