दिलीप मानेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर सुभाष देशमुख मतदान केंद्रावर ठाण मांडून
सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। : पुणे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोलापुरात शुक्रवारी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख नेत्यांनी लक्ष घातल्याने चुरस वाढली असून, मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय ह
sdfg


सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।

: पुणे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोलापुरात शुक्रवारी उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. यंदाच्या निवडणुकीत प्रमुख नेत्यांनी लक्ष घातल्याने चुरस वाढली असून, मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.

माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या संस्थेतील सुमारे १,७०० मतदारांना एकत्र आणत शक्तिप्रदर्शन केले. हे सर्व मतदार सामूहिकरीत्या मतदानासाठी रवाना झाल्याने सोलापुरातील राजकीय वर्तुळात या घडामोडीची चर्चा रंगली.

दिलीप माने यांच्या ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या कार्यालयाशेजारीच सिद्धेश्वर कन्या प्रशालेतील मतदान केंद्र आहे. काही वेळानंतर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी या मतदान केंद्राला भेट दिली. त्यांनी मतदान केंद्रावरील कार्यकर्त्यांसोबत बसून तेथे येणाऱ्या मतदारांशी संवाद साधला. दिलीप माने यांच्या शक्तिप्रदर्शनानंतर शेजारील मतदान केंद्रावर सुभाष देशमुख यांनी उपस्थिती लावल्याने या घडामोडीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडून स्मिता जाधव, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून हर्षदा जाधव-देशमुख रिंगणात असल्याचे वृत्त आहे. प्रमुख नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने लढत चुरशीची बनली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्षासोबतच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते-पाटील गट यांच्यातील राजकीय समीकरणांचीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होत आहे. त्यामुळे मतदानाचा कल आणि निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande