उदगीरमध्ये रस्त्यापेक्षा पुलाचे काम उंचीवर झाल्याने गैरसोय
लातूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। उदगीर तालुक्यातील सुकणी गावाजवळ दोन पूल बनविण्यात आले. पुल रस्त्यापेक्षा उंचीवर झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरुन पुलावर चढणे, उतरण्यासाठी कसरत करावी लागते. पूल बनवताना येथे अनेक दुर्दैवी घटना घडल्या. एकाचा ज
नागरिकांना गैरसोय


लातूर, 24 ऑक्टोबर (हिं.स.)।

उदगीर तालुक्यातील सुकणी गावाजवळ दोन पूल बनविण्यात आले. पुल रस्त्यापेक्षा उंचीवर झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरुन पुलावर चढणे, उतरण्यासाठी कसरत करावी लागते.

पूल बनवताना येथे अनेक दुर्दैवी घटना घडल्या. एकाचा जिव गेला, एस. टी. महामंडळ बस पलटी झाली मात्र जिवीत हानी झाली नाही, दुचाकीस्वार ही पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम

विभाग मात्र झोपेत आहे. आता ऊस कारखाने सुरू झाले आहेत. ऊसाचे

अवजड वाहने या पुलावरून चालवणे अवघड झाले आहे. पुलावर मोठे मोठे खड्डे पडले असून कधीही अवजड वाहन पलटी होऊ शकते. पुलावर चढताना व उतरताना मोठी कसरत वाहनचालकांना करावी लागत आहे. या ठिकाणी कधीही मोठी घटना घडू शकते हे नाकारता येणार नाही. संबधीत गुत्तेदार यांना सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्त करण्यासाठी सूचना करत नसताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून अशीच अवस्था या पुलाची झालेली आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे मोठे वाहन व दुचाकी घसरल्या आहेत. पावसाच्या कालावधीत हा रस्ता चिखलमय बनतो. तसेच सुकणी गावामध्ये कुणाच्या परवानगीने गतीरोधक बनविण्यात आले.

कुणी बनवले याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागास नाही. ४ गतीरोधक बनविण्यात आले ते फक्त अर्धा रोड, प्रत्येक वाहन ज्या अर्धा रोडवर गती रोधक नाही येथून जात आहेत. येथे ही कधीही घटना घडू शकते. याकडे संबंधीत विभागाने लक्ष देण गरजेचे आहे. संबंधित विभागाने योग्य ती पाहणी करून कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande