नांदेड टेक्सटाईल मिल पुनर्जीवित करण्यासाठी कटिबद्ध - आमदार आनंद बोंढारकर
नांदेड, 04 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड टेक्सटाईल मिल (उस्मान शाही मिल) पुनर्जीवित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार आनंद बोंढारकर यांनी सांगितले. नांदेड टेक्सटाईल मिल (उस्मान शाही मिल) येथे प्रत्यक्ष भेट देऊन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मिल परि
अ


नांदेड, 04 ऑक्टोबर (हिं.स.)।

नांदेड टेक्सटाईल मिल (उस्मान शाही मिल) पुनर्जीवित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार आनंद बोंढारकर यांनी सांगितले.

नांदेड टेक्सटाईल मिल (उस्मान शाही मिल) येथे प्रत्यक्ष भेट देऊन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मिल परिसराची पाहणी केली.

नांदेड जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नाला चालना देण्यासाठी तसेच अनेक वर्षांपासून बंद असलेली नांदेड टेक्सटाईल मिल पुन्हा सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ही मिल पुनर्जीवित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत, नांदेड टेक्सटाईल मिल पुनर्जीवित करण्याच्या संघर्ष समितीच्या प्रयत्नांना माझा ठाम पाठिंबा असल्याचा विश्वास दिला.

सर्वांच्या सहकार्याने नांदेड टेक्सटाईल मिल पुन्हा सुरू करून नांदेडचे गतवैभव आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी आपण एकजुटीने प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande