सत्ताधाऱ्यांना हायकोर्टाचा धक्का; अमरावती जिल्हा बँकेवर आता प्रशासक राज
अमरावती, 06 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग सोमवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ कायम ठ
सत्ताधाऱ्यांना हायकोर्टाचा धक्का जिल्हा बँकेवर आता प्रशासक राज


अमरावती, 06 ऑक्टोबर (हिं.स.)

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग सोमवारी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ कायम ठेवावा, यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आता बँकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे.

बँकेच्या संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आला. मात्र, त्यापूर्वीच विद्यमान संचालक मंडळाने बँकेवर प्रशासक नियुक्त होऊ नये आणि संचालक मंडळाला मुदतवाढ मिळावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी झाली. दरम्यान सदरचे प्रकार निर्णयाकरिता क्लोज करण्यात आले होते. यावर सोमवारी निर्णय देणार असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे या निर्णयाकडे लक्ष लावून असलेल्या विद्यमान संचालनकांना फटका बसला. बँकेने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून मतदार यादीचा कार्यक्रमही सुरू आहे. त्यामुळे एकीकडे निवडणुकीची तयारी आणि दुसरीकडे संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने आता बँकेच्या प्रशासकीय कारभारांची सूत्रे कोणाकडे सोपविली जाणार, याकडे सभासद व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.-----------------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande