दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, अहमदपूरच्या मानाच्या दुर्गामाता नवरात्र महोत्सव समितीची बैठक
लातूर, 06 ऑक्टोबर (हिं.स.)। अहमदपूर शहरातील फुले नगर येथील मानाच्या दुर्गामाता नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीने यंदाचा नवरात्र महोत्सव सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्याच्या अनुषंगाने नियोजन बैठक नुकतीच संपन
नवरात्र उत्सव


लातूर, 06 ऑक्टोबर (हिं.स.)।

अहमदपूर शहरातील फुले नगर येथील मानाच्या दुर्गामाता नवरात्र महोत्सव तरुण मंडळाच्या वतीने यंदाचा नवरात्र महोत्सव सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्याच्या अनुषंगाने नियोजन बैठक नुकतीच संपन्न झाली.

बैठकीस संजय भाऊ माने, अजित रेड्डी, संतोष कोटगिरे, मनोज आरदवाड, विजय जगताप, लक्ष्मण अय्या, गणेश बेंबळकर तसेच कुमार चव्हाण महाराज यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्रातील सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत उपस्थितांच्या सर्वानुमते आगामी दुर्गामाता नवरात्र महोत्सवासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी विवेक गणेश बेंबळकर, उपाध्यक्षपदी कार्तिक पुरोहित, सचिवपदी श्रेयश द्वारकादास नाईक, उपसचिवपदी राज पाटील, देखावा प्रमुखपदी अभिमन्यू कदम, कोषाध्यक्षपदी महेश चौधरी तर आरती प्रमुखपदी कुमार चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा नवरात्र महोत्सव अधिक व्यापक, शिस्तबद्ध आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासोबतच समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्याचा संकल्पही मंडळाच्या वतीने करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande