
लातूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणूक अनुषंगाने माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'वेळ आल्यास बदमाश अधिकाऱ्याकडे पाहू' असा दम भरला आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असताना अधिकारी त्यांना जुमानत नाहीत चुकीचे काम करतात असा दावा पत्रकार परिषदेत माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील यांनी केला आहे. वेळ आल्यास बदमाश अधिकाऱ्याकडे पाहू असा इशारा त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis