सोलापूर विमानतळावर शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरले; महिला वैमानिक सुखरूप
सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर विमानतळावर गुरुवारी दुपारी उड्डाणाचा सराव करत असताना एक शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरून बाजूला गेले. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, विमानाचे नियंत्रण करणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थी वैमा
Ndns


सोलापूर, 12 नोव्हेंबर (हिं.स.)।

सोलापूर विमानतळावर गुरुवारी दुपारी उड्डाणाचा सराव करत असताना एक शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरून बाजूला गेले. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, विमानाचे नियंत्रण करणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थी वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून त्या सुखरूप आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक उड्डाणाचा सराव करत होत्या. यावेळी विमान वेग घेत असताना अचानक धावपट्टीवरून घसरून बाजूला गेले. या अनपेक्षित घटनेमुळे विमानतळ प्रशासनाची धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक आणि पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरण्यामागे तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. विमानाचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande