गोदावरीत अनधिकृत बांधकाम प्रकरणी 24 जणांना नोटिसा, हायकोर्टात नाशिक मनपाचे प्रतिज्ञापत्र सादर
नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। :गोदावरी नदीपात्रालगत सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून महापालिकेची भूमिका स
Notices issued to 24 people in


Notices issued to 24 people in


नाशिक, 22 नोव्हेंबर (हिं.स.)।

:गोदावरी नदीपात्रालगत सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल अवमान याचिकेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करून महापालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या पुनसर्वेक्षणात १४ अनधिकृत बांधकामे आढळली असून, याप्रकरणी एकूण २४ नोटिसा बजावल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. याप्रकरणी आता ११ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून, त्याकडे गोदाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

निशिकांत पगारे यांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये गोदावरी नदीवरील दोन महत्त्वाच्या कामांवर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यात अहिल्यादेवी होळकर पुलाखाली उभारण्यात आलेला स्वयंचलित यांत्रिक गेट आणि गोदावरी नदी सुशोभीकरण व नदीकिनारा संरक्षण प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेली आरसीसी संरक्षक भिंत यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्तांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, यांत्रिक गेटची उभारणी, पूरनियंत्रण, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे, गाळ साचण्याचे प्रमाण कमी करणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता राखणे, या उद्देशाने करण्यात आली आहे. यापूर्वीचा ८८ वर्षे जुना दगडी बंधारा असुरक्षित झाला होता, असा दावाही करण्यात आला आहे. संरक्षक भिंत नदीकिनाऱ्याची धूप रोखण्यासाठी, रस्ते व सार्वजनिक मालमत्तेचे पूरस्थितीत संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

ही भिंत नदीपात्रापासून सुमारे १० ते १५ फूट अंतरावर असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कामांना आवश्यक तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मान्यता मिळाल्या असून, तांत्रिक अहवालाचाही आधार घेण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नदीपात्रातील बांधकामांबाबत महत्त्वाचा मुद्दा प्रतिज्ञापत्रात ब्लू लाइन आणि रेड लाइन क्षेत्रातील बांधकाम नियमांचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न गोदावरी नदीचे नैसर्गिक अस्तित्व, नदीपात्राचे संरक्षण आणि न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. आता या प्रकरणात उच्च न्यायालय काय भूमिका घेते आणि गोदावरी नदीच्या संरक्षणाबाबत पुढील काय निर्देश देते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. न्या. ए. एस. गडकरी यांच्या दालनात सुनावणी पार पडली. याचिककर्त्यांच्या वतीने अॅड. भरत गडवी यांनी काम पाहिले.

चौकट

या प्रतिज्ञापत्रात बरेच चुकीचे व दिशाभूल करणारे मुद्दे आहेत. त्यावर पुढील तारखेच्या अगोदर म्हणजे ११ डिसेंबर २०२६ च्या अगोदर याचिकाकर्त्यांच्या वतीने सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे.

निशिकांत पगारे, याचिकाकर्ता

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande