नेपाळमध्ये रिश्टर स्केलवर ५.४ तीव्रतेचा भूकंप; भारतासह चार देशांना धक्के
काठमांडू, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळच्या कोशी प्रांतात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी होती. या भूकंपाचे धक्के भारत, भूतान आणि बां
नेपाळमध्ये रिश्टर स्केलवर ५.४ तीव्रतेचा भूकंप; भारतासह चार देशांना धक्के


काठमांडू, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळच्या कोशी प्रांतात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागाच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी होती. या भूकंपाचे धक्के भारत, भूतान आणि बांगलादेशातील अनेक भागांत जाणवले. तसेच चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त समोर आले आहे.

यूएसजीएसच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजून २ मिनिटांनी हा भूकंप झाला. नेपाळच्या कोशी प्रांतातील लेलेप परिसर हे भूकंपाचे केंद्र होते. जमिनीखाली सुमारे २० किलोमीटर खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.५ इतकी होती. पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी हा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (एनसीएस) माहितीनुसार, जमिनीखाली १५ किलोमीटर खोलीवर त्याचा केंद्रबिंदू होता. आसाममधील भूकंपाचे केंद्र २५.७४३ अंश उत्तर अक्षांश आणि ९३.३५५ अंश पूर्व रेखांशावर नोंदवण्यात आले.

याशिवाय, पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कूचबिहार या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पश्चिम बंगालमधील या भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले आहे का, याची माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. प्रभावित भागांमध्ये संभाव्य नुकसानीची तपासणी सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande