
माघारीनंतर राजकीय समीकरणांना वेग, बिनविरोध निवडीकडेही लक्ष
लातूर, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे. बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची अधिकृत यादी समोर आली असून, त्यामध्ये एकूण ४५ नोंदींचा समावेश आहे. विविध मतदारसंघांतून उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
विकास संस्था, महिला प्रतिनिधी, मजूर सहकारी संस्था, नागरी बँक व इतर, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग, भटक्या-विमुक्त जाती तसेच विविध विशेष मतदारसंघांतील उमेदवारांनी माघार घेतली आहे.
माघार घेतलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय यादी
१. बिराजदार युवराज शाहुराज — विकास संस्था, औसा तालुका
२. पवार शोभा अभिमन्यू — महिला प्रतिनिधी
३. केंद्रे अनिता प्रभाकर — महिला प्रतिनिधी
४. छायादेवी श्रीपतराव काकडे — महिला प्रतिनिधी
५. राहुल बाळासाहेब गरड — मजूर, विटभट्टी, औद्योगिक
६. रवि धनराज जाधव — विकास संस्था, रेणापूर तालुका
७. बिराजदार विश्वनाथ शामराव — विकास संस्था, औसा तालुका
८. सावंत गोरख दासा — विकास संस्था, औसा तालुका
९. बाबासाहेब गणपतराव पाटील — मजूर, विटभट्टी, औद्योगिक
१०. सुहास बापूराव पाचपुते — नागरी बँक व इतर
११. मिनाताई अशोकराव सूर्यवंशी — महिला प्रतिनिधी
१२. मुळे महेंद्र शामराव — विकास संस्था, लातूर तालुका
१३. शिंदे रघुनाथ दिलीप — विकास संस्था, लातूर तालुका
१४. जाधव बाबुराव माधवराव — विकास संस्था, जळकोट तालुका
१५. सूर्यवंशी आनंद विठ्ठलराव — अनुसूचित जाती व जमाती
१६. भोसले विरसेन बाबुराव — विकास संस्था, लातूर तालुका
१७. पाटील धर्मपाल रामराव — इतर मागासवर्ग
१८. पाटील धर्मपाल रामराव — विकास संस्था, चाकूर तालुका
१९. सुळ संभाजी गोविंदराव — भटक्या विमुक्त जाती
२०. सूर्यवंशी ज्ञानोबा यशवंतराव — विकास संस्था, शिरूर अनंतपाळ
२१. शेळके अनुप ज्ञानोबा — इतर मागासवर्ग
२२. माने जयेश विश्वंभरराव — विकास संस्था, शिरूर अनंतपाळ
२३. देशमुख उमाकांत सुभाषराव — विकास संस्था, रेणापूर
२४. आल्टे दत्तू निवृत्ती — अनुसूचित जाती-जमाती सदस्य
२५. जाधव राजकुमार भाऊराव — मत्स्य सहकार संस्था, कु.स. संस्था
२६. जाधव प्रदीप नारायण — विकास संस्था, चाकूर तालुका
२७. कावळे रुचिका सिद्धेश्वर — अनुसूचित जाती किंवा जमाती सदस्य
२८. कावळे रुचिका सिद्धेश्वर — महिला प्रतिनिधी मतदारसंघ
२९. नांदगावे ओमप्रकाश गिरीधर — भटक्या जमाती विशेष मागास वर्ग
३०. वलांडे नागोराव माणिकराव — विकास संस्था, उदगीर
३१. प्रकाश जालिंदर देशमुख — नागरी बँक व इतर
३२. अंबेकर सतीश रावसाहेब — मजूर सहकारी संस्था
३३. नाडे विजय प्रकाश — मजूर सहकारी संस्था
३४. रमेश काशिराम कराड — नागरी सहकारी पतसंस्था
३५. रमेश काशिराम कराड — विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ
३६. बिरादार ओमप्रकाश लक्ष्मण — विकास संस्था, निलंगा
३७. जाधव दिनकर रामराव — विकास संस्था, अहमदपूर
३८. अशोक निवृत्तीराव केंद्रे — विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ
३९. संतोष भानुदास बेंबडे — इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
४०. ऋषिकेश रमेश कराड — विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ
४१. भांगे सर्जेराव शंकरराव — नागरी बँक व इतर
४२. शरद गंगाधर हुडगे — नागरी बँक व इतर
४३. बिरादार यशवंत किशनराव — नागरी बँक व इतर
४४. गोरे भरत ज्ञानोबा — नागरी बँक व इतर
४५. गोरे भरत ज्ञानोबा — इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
चार उमेदवारांची दोन मतदारसंघांत नोंद
माघारीच्या यादीतील विशेष बाब म्हणजे काही उमेदवारांची नावे एकापेक्षा अधिक मतदारसंघांसाठी नोंदविण्यात आली आहेत. यामध्ये पाटील धर्मपाल रामराव, कावळे रुचिका सिद्धेश्वर, रमेश काशिराम कराड आणि गोरे भरत ज्ञानोबा यांचा समावेश आहे. त्यामुळे यादीतील ४५ नोंदी म्हणजे स्वतंत्र ४५ उमेदवारांची संख्या नसल्याचे स्पष्ट होते.
सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे नेते, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि स्थानिक पातळीवरील प्रभावशाली व्यक्तींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.माघारीच्या प्रक्रियेनंतर कोणत्या मतदारसंघात कोणाचे पारडे जड होणार, कोणत्या जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होणार आणि कोणत्या मतदारसंघांत थेट राजकीय संघर्ष रंगणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.एकूणच, उमेदवारी अर्ज माघारीच्या या प्रक्रियेमुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis