डॉ. वसंतराव मोरे, डॉ.शरद भूथाडिया ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प
तीस मान्यवरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कार


कोल्हापूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि ब्रँड कोल्हापूरचे संकल्पक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार देण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तीस मान्यवरांना ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे.

प्रमुख पाहुणे पानिपतकार विश्वास पाटील यांनी कोल्हापूरच्या मातीमध्ये वेगळी ऊर्जा असल्याचे नमूद केले. कोल्हापूर शहराशी आपले अनोखे नाते त्यांनी अनेक संदर्भ देऊन उपस्थित त्यांना खिळवून ठेवले.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ब्रँड कोल्हापूर पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आपल्या कामगिरीने कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक केल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande