टोरंट प्रकल्पाच्या समर्थनासोबत स्थानिकांच्या हक्कांचा आग्रह; भाजपची भूमिका स्पष्ट
रायगड, 05 नोव्हेंबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाने आज कर्जत रॉयल गार्डन येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजांसाठी वीजनिर्मिती प्रकल्प आवश्यक असले, तरी स
कर्जत : कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजांसाठी वीजनिर्मिती प्रकल्प आवश्यक असले, तरी स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली.  २०२७ ते २०४७ या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पायाभूत सुविधा आणि वीजनिर्मिती प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यातून स्थानिकांना किमान २० टक्के पाणीवाटप, शेती व पिण्यासाठी नियमित पाणीपुरवठा आणि भूमिपुत्रांना १०० टक्के रोजगार मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.  दरम्यान, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड, जैवविविधतेला संभाव्य धोका, पर्यावरण संवर्धन आणि यापूर्वीच्या धरण प्रकल्पांतील प्रलंबित पुनर्वसनाच्या प्रश्नांवरून पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाला विरोध सुरू असताना भाजपने भूमिका मांडण्यास विलंब का केला, असा सवालही उपस्थित करण्यात आला.  यावर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेले पर्यावरण, पुनर्वसन आणि स्थानिकांच्या हक्कांचे मुद्दे पक्षनेतृत्व तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे स्पष्ट केले. स्थानिकांना कायदेशीर आणि योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाला पाठिंबा आणि स्थानिकांच्या हक्कांचा आग्रह या दुहेरी भूमिकेवरून पत्रकार परिषदेत चर्चा रंगली.


रायगड, 05 नोव्हेंबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंट पॉवर प्रकल्पाबाबत भारतीय जनता पक्षाने आज कर्जत रॉयल गार्डन येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजांसाठी वीजनिर्मिती प्रकल्प आवश्यक असले, तरी स्थानिक नागरिक आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली.

२०२७ ते २०४७ या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पायाभूत सुविधा आणि वीजनिर्मिती प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रकल्पातील जलसाठ्यातून स्थानिकांना किमान २० टक्के पाणीवाटप, शेती व पिण्यासाठी नियमित पाणीपुरवठा आणि भूमिपुत्रांना १०० टक्के रोजगार मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रकल्पामुळे होणारी वृक्षतोड, जैवविविधतेला संभाव्य धोका, पर्यावरण संवर्धन आणि यापूर्वीच्या धरण प्रकल्पांतील प्रलंबित पुनर्वसनाच्या प्रश्नांवरून पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. गेल्या दोन वर्षांपासून प्रकल्पाला विरोध सुरू असताना भाजपने भूमिका मांडण्यास विलंब का केला, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

यावर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांनी उपस्थित केलेले पर्यावरण, पुनर्वसन आणि स्थानिकांच्या हक्कांचे मुद्दे पक्षनेतृत्व तसेच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे स्पष्ट केले. स्थानिकांना कायदेशीर आणि योग्य न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे प्रकल्पाला पाठिंबा आणि स्थानिकांच्या हक्कांचा आग्रह या दुहेरी भूमिकेवरून पत्रकार परिषदेत चर्चा रंगली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande