
पुणे, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : परिवहन सेवा पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहन नोंदणी, शिकाऊ अनुज्ञप्ती आणि वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती या सेवांबाबत नागरिकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सेवा वितरण मूल्यांकन (NeSDA) २०२५ अंतर्गत नागरिक सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात संबंधित सेवांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी सहभागी होऊन आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार विभागामार्फत (DARPG) हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. परिवहन सेवा पोर्टल (https://parivahan.gov.in) द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सेवांचा दर्जा आणि नागरिकांना मिळणारा अनुभव जाणून घेणे हा या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश आहे.
या सर्वेक्षणाची लिंक NeSDA Way Forward पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना थेट ऑनलाइन लिंकद्वारेही आपला अभिप्राय नोंदविता येणार आहे.
अभिप्राय नोंदविण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ अशी आहे. त्यामुळे वाहन नोंदणी, शिकाऊ अनुज्ञप्ती तसेच वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती या सेवांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी दिलेल्या मुदतीत सर्वेक्षणात सहभागी होऊन आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक सर्वेक्षण लिंक : https://forms.gle/MPDGVJ&KPBnMKSEA
परिवहन सेवा पोर्टल : https://parivahan.gov.in
------------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु