रत्नागिरी : जिल्ह्यात १ लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांची नोंदणी
रत्नागिरी, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण अभियाना''ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षम
रत्नागिरी : जिल्ह्यात १ लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांची नोंदणी


रत्नागिरी, 07 नोव्हेंबर (हिं.स.) । शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला शेतकरी सक्षमीकरण अभियाना'ला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या अभियानात जिल्ह्यातील १ लाख १२५ महिला शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यात अभियानांतर्गत एकूण १९६ ग्रामसभा पार पडल्या असून, आतापर्यंत पात्र व सहभागी महिलांना १२ हजार १३२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service या अधिकृत संकेतस्थळावरून महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा आणि या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय नोंदणी अशी :

* रत्नागिरी : १८,८९१

* चिपळूण : १८,४४७

* गुहागर : ११,३६७

* खेड : ११,२६३

* राजापूर : ९,१७३

* संगमेश्वर : ९,०७६

* दापोली : ८,९४६

* लांजा : ८,३३०

* मंडणगड : ४,६२७.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande