इगतपुरीच्या निसर्गरम्य कुशीत 'होलिस्टिक' क्रांती
-डॉ. मिकी मेहता बनले ''अर्थ वन''चे ब्रँड ॲम्बेसेडर ​नाशिक, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। पश्चिम घाटातील मनमोहक निसर्ग आणि ५० एकरचा भव्य परिसर लाभलेल्या इगतपुरीतील ''अर्थ वन'' या प्रिमियम गेटेड प्लॉटेड विकास प्रकल्पाने एक मोठी घोषणा केली आहे. भारता
Holistic Scenic Lap  Igatpuri


Holistic Scenic Lap  Igatpuri


-डॉ. मिकी मेहता बनले 'अर्थ वन'चे ब्रँड ॲम्बेसेडर

​नाशिक, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। पश्चिम घाटातील मनमोहक निसर्ग आणि ५० एकरचा भव्य परिसर लाभलेल्या इगतपुरीतील 'अर्थ वन' या प्रिमियम गेटेड प्लॉटेड विकास प्रकल्पाने एक मोठी घोषणा केली आहे. भारताचे सुप्रसिद्ध होलिस्टिक हेल्थगुरू डॉ. मिकी मेहता यांची या प्रकल्पाचे 'होलिस्टिक लिव्हिंग ॲम्बेसेडर' म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील केवळ घरांची किंवा जमिनीची विक्री करण्याच्या पारंपरिक पद्धतीला छेद देत, निवासाचे स्थान माणसाच्या संपूर्ण कल्याणात कशी महत्त्वाची भूमिका बजावते, हा विचार या सहयोगातून मांडण्यात आला आहे.

​युनायटेड बिल्डर्स आणि ललित रूंगटा ग्रुप यांच्या धोरणात्मक भागीदारीतून साकारलेला हा प्रकल्प दारणा धरणाच्या बॅकवॉटर्सजवळ असून, येथे बांधकामासाठी तयार असलेले एनए प्लॉट्स उपलब्ध आहेत. या भागीदारीबद्दल बोलताना युनायटेड बिल्डर्सचे भागीदार राजन दरयानी यांनी स्पष्ट केले की, अर्थ वनचा उद्देश केवळ जमिनीची विक्री करणे नसून एक समृद्ध वारसा आणि समुदायाची निर्मिती करणे हा आहे. डॉ. मिकी मेहता यांचे तत्वज्ञान आमच्या या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांशी पूर्णपणे सुसंगत असून, यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात एक शाश्वत मूल्य निर्माण होणार आहे.

या नवीन भूमिकेबद्दल डॉ. मिकी मेहता यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, इगतपुरीतील नैसर्गिक ऊर्जा, शुद्ध हवा आणि मोकळे आकाश शारीरिक व आध्यात्मिक कल्याणासाठी अत्यंत पोषक आहे. निसर्ग, आधुनिक डिझाइन आणि आरोग्य यांचा हा त्रिवेणी संगम लोकांच्या दैनंदिन जगण्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

​या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण असलेला 'अर्थ वन क्लब' हा सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरणार आहे. समृद्धी महामार्ग आणि घोटी-सिन्नर महामार्गाच्या सान्निध्यात असल्याने कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनेही हा प्रकल्प गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande