रत्नागिरीत संस्कारक्षम बालनाट्यांचा महोत्सव रंगतदार
रत्नागिरी, 3 फेब्रुवारी, (हिं. स.) : बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथील ड्रिम्स इव्हेंटतर्फे बालप्रेक्षक आणि पालकांसाठी संस्कारक्षम बालनाट्य महोत्सव येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रविवारी (दि. १ फेब्रुवारी) उत्साहात झाल
रत्नागिरीत संस्कारक्षम बालनाट्यांचा महोत्सव रंगतदार


रत्नागिरी, 3 फेब्रुवारी, (हिं. स.) : बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथील ड्रिम्स इव्हेंटतर्फे बालप्रेक्षक आणि पालकांसाठी संस्कारक्षम बालनाट्य महोत्सव येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात रविवारी (दि. १ फेब्रुवारी) उत्साहात झाला

महोत्सवाचे उद्धघाटन नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते झाले. पटवर्धन हायस्कूल, दामले विद्यालय-रत्नागिरी, युथ फोरम - देवगड, अलंकार अकादमी- कोल्हापूर येथील बालकलाकारांच्या अभिनयाला पालक-ज्येष्ठ रंगकर्मी रसिकांनी दाद दिली.

यावेळी नगराध्यक्ष सौ. सुर्वे यांच्यासह बालकल्याण सभापती प्रीती सुर्वे, नगरसेवक व उद्योजक सौरभ मलुष्टे, नगरसेवक श्रद्धा हळदणकर, मेधा कुलकर्णी, दीपक पवार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, सतीश दळी, बालरंगभूमीचे अध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, निवृत्त मुख्याध्यापक शौकत गोलंदाज, सीमा कदम, पटवर्धन हायस्कूलचे विश्वस्त विनायक हातखंबकर, तसेच ड्रिम्स इव्हेंटचे शहबाज गोलंदाज व निरंजन सागवेकर उपस्थित होते.

बालनाट्य महोत्सवाची सुरुवात येथील पटवर्धन हायस्कूलची 'धोंड' या बालनाट्याने झाली. या बालनाट्यात सध्या मोबाइलच्या जगात वावरणाऱ्या प्रत्येकाने पाहावे अशी संहिता शिक्षक योगेश कदम यांच्या लेखणीतून उतरली होती. पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी या बालनाट्यात अभिनय साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. त्यानंतर देवगड येथील यूथ फोरमचे 'लगोरी' बालनाट्य झाले. रस्त्यावर राहणाऱी मुले आणि उच्चभ्रू घरातील मुलांचे प्रेम यात साकारण्यात आले. दुपारच्या सत्रात कोल्हापूर येथील अलंकार कला अकादमीचे 'चेटकिणीच्या बंगल्यात' बालनाट्य सादर झाले. अभ्यास न करणाऱ्या मुलांच्या उपद्व्यापावर प्रकाश टाकणाऱ्या या बालनाट्याला रसिकांनी दाद दिली. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषद शाळा- क्र.१५ अर्थात दामले विद्यालयाचे विद्यार्थी 'काय ते जून' ही नाट्यकृती सादर झाली. इतिहासाचा मागोवा घेणारे हे बालनाट्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी बालकलाकारांसह या संस्कारक्षम बालनाट्य पालक व शिक्षक, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच ड्रिम्स इव्हेंटचे पदाधिकारी तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande