उज्जैनमधील महाकाल मंदिराला गायक मिका सिंग यांनी दिली भेट
उज्जैन, ७ फेब्रुवारी, (हिं.स.)। बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग यांनी उज्जैनमधील महाकाल मंदिराला आज भेट दिली. आज पहाटे सुमारे चार वाजता ते विश्वप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिर येथे दाखल झाले. पहाटे होणाऱ्या भस्म आरतीत त्यांनी सहभाग घेतला. नंदी
उज्जैनमधील महाकाल मंदिराला गायक मीका सिंग यांनी दिली भेट


उज्जैन, ७ फेब्रुवारी, (हिं.स.)। बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग यांनी उज्जैनमधील महाकाल मंदिराला आज भेट दिली. आज पहाटे सुमारे चार वाजता ते विश्वप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिर येथे दाखल झाले. पहाटे होणाऱ्या भस्म आरतीत त्यांनी सहभाग घेतला. नंदी हॉलमध्ये बसून त्यांनी सुमारे दीड तास भगवान महाकालांचे दर्शन घेतले. आरतीदरम्यान मीका सिंग पूर्णतः भक्तिभावात तल्लीन असल्याचे दिसून आले. आरतीनंतर त्यांनी बाबा महाकालांचा आशीर्वाद घेतला.

इंदूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी आलेल्या मीका सिंग यांनी त्याच दरम्यान उज्जैनला भेट देत मंदिरात दर्शन व पूजा-अर्चना केली. मंदिरात आगमनावेळी महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सहाय्यक प्रशासक मूलचंद जूनवाल यांनी त्यांचे आत्मीय स्वागत व सत्कार केला. यावेळी त्यांना बाबा महाकालांचा प्रसाद व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मीका सिंग यांनी आनंद व्यक्त केला.

भगवान महाकालांनी दर्शनासाठी बोलावल्याचे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. इंदूरला येताना उज्जैनला येऊन महाकाल मंदिरात दर्शन घेणे आपली परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले. भस्म आरतीचा अनुभव अद्वितीय असून तो आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. मंदिर परिसरातील स्वच्छता आणि भव्य वातावरणाचे कौतुक करताना, येथील वातावरण अत्यंत शांत आणि मनोहरी असल्याचे ते म्हणाले. कुटुंबीय व चाहत्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी आपण आलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande