पंचकन्यांचा प्रहार करणार अन्यायाचा संहार; 'जुळली गाठ गं' मालिकेत मोठा ट्विस्ट
मुंबई, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। ''सन मराठी'' वाहिनीवरील ''जुळली गाठ गं'' या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेत सावी व धैर्य या दोघांना वेगळं करण्यासाठी दामिनी सातत्याने कट रचत आहे. काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद हा
मुंबई


मुंबई, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। 'सन मराठी' वाहिनीवरील 'जुळली गाठ गं' या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेत सावी व धैर्य या दोघांना वेगळं करण्यासाठी दामिनी सातत्याने कट रचत आहे. काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद हा व्यक्ती आला. भाऊंचा विद्यार्थी असल्याचा बनाव करत स्वतःच्या बिझनेस साठी त्याने सावीकडे मदत मागितली. मदतीसाठी होकार देऊन सावी नकळत या प्रकरणात अडकते. सावी वर अंगदला आत्महत्या साठी प्रवृत्त करण्याचा आणि अंगदचा विनयभंग केल्याचा आरोप लावून अटक करण्यात येते. या प्रकरणातून निर्दोष सुटण्यासाठी सावी ही लढाई लढत आहे.

या लढाईत सावीच्या मदतीसाठी 'सन मराठी' वरील सदस्य एकत्र येणार आहेत. इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी धावून आली आहे. तर कायद्याच्या कचाट्यातून सोडवायला राणी देखील सावी सोबत उभी आहे. पण आता अर्पिता, अनुप्रिया, आणि वैदही यांचीही साथ सावीला मिळणार आहे. राणी, मंजू, अर्पिता, अनुप्रिया, वैदेही या पंचकन्या सावीला कसं निर्दोष सिद्ध करतील? आणि हे करताना त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील आहे.

या पंचकन्यांच्या विशेष भागाबद्दल सावी म्हणजेच अभिनेत्री पायल मेमाणे म्हणाली की, सावी हे पात्र घराघरात पोहोचलं आहे. सावी ही लग्न आधी बेधडक होती. पण लग्नानंतर तिच्यात काही बदल झाले आहेत. सध्या सावी वर प्रचंड मोठ संकट आलेल आहे. विनयभंगाचा खोटा आरोप लागून ती तिच्या अस्तित्वाची लढाई लढतीये. आज महाराष्ट्रात बऱ्याच महिलांवर अन्याय होत असेल त्या अन्यायाला सामोरं कसं जायचं हेच आमच्या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. सावीच्या मदतीसाठी इतर मालिकेतील अभिनेत्री ही एकत्र आल्या आहेत. या पंचकन्या अन्यायाचा संहार कसा करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सर्व सीनसाठी आम्ही सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यामुळे प्रेक्षकांना मी विनंती करेन हा भाग अजिबात चुकवू नका.

हा 'अंतिम निकालाचा टप्पा' पाहायला विसरू नका, ८ फेब्रुवारी दुपारी १ आणि सायं. ७ वा. सन मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande