अमरावती - गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे ग्राहकांची झुंबड; पोलिस बंदोबस्तात सिलेंडरचे वितरण
अमरावती, 12 मार्च (हिं.स.) आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता इंधन पुरवठ्यावर दिसू लागला असून गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अमरावती शहरातील गॅस एजन्सींवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे ग्राहकांची झुंबड; अमरावतीत पोलिस बंदोबस्तात सिलेंडर वितरण


अमरावती, 12 मार्च (हिं.स.)

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता इंधन पुरवठ्यावर दिसू लागला असून गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अमरावती शहरातील गॅस एजन्सींवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक सकाळपासूनच रांगा लावत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.अमरावतीच्या अंबादेवी रोडवरील देशमुख गॅस एजन्सीवरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडत असल्याने वितरण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चार ते पाच पोलिसांच्या उपस्थितीत ग्राहकांना शिस्तबद्ध पद्धतीने सिलेंडरचे वितरण सुरू आहे.

दरम्यान, अचानक वाढलेल्या मागणीमुळे एजन्सींवर ताण वाढला असून नागरिकांनी घाईगडबड न करता संयम राखावा, असे आवाहनही संबंधितांकडून करण्यात येत आहे. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande