
अमरावती, 12 मार्च (हिं.स.)
महापालिकेतील महापैार वगळता उपमहापैारांसह स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व विरोधी पक्षनेता यांना वाहन भत्त्यापोटी प्रतीमाह पन्नास हजार रूपये देण्यास स्थायी समितीने मंजूरी प्रदान केली आहे. यासोबतच गटनेते, विषय समिती सभापती व अधिकाऱ्यांना ३५ हजार रूपये प्रतीमहीना भत्ता देण्यासही मंजूरी देण्यात आली.
चार वर्षांनंतर अस्तीत्वात आलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीची पहीली सभा बुधवारी (ता.११) पार पडली.या सभेत पदाधिकाऱ्यांना वाहनं पुरवण्यासह महापालिकेस पुरवण्यात येत असलेल्या ई बसेससाठी चार्जींग स्टेशनला लागणाऱ्या सबस्टेशनला मंजूरी देण्याचा विषय कार्यक्रम पत्रिकेवर होता.सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना वाहन पुरवण्यात प्रशासन असमर्थ असल्याची कबूली अधिकाऱ्यांनी दिली.सर्व पदाधिकाऱ्यांसाठी नविन वाहनं खरेदी कऱण्याइतका खर्च मनपा प्रशासन सद्या करून शकत नसल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून पदाधिकाऱ्यांना वाहन भत्ता देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.यानुसार महापैार वगळता उपमहापैार, स्थायी समिती सभापती,सभागृह नेता व विरोधी पक्षनेता यांना दर महा पन्नास हजार रूपये वाहन भत्ता मंजूर करण्यात आला.तर, गटनेते,विषय समिती सभापती, झोन सभापती व अधिकारी यांना प्रतीमाह पस्तीस हजार रूपये वाहन भत्ता देण्यास स्थायी समितीने मंजूरी प्रदान केली.या पदाधिकाऱ्यांना स्वतःची वाहन वापरायची असून त्यावरील चालक व इंधनाचा खर्च वाहन भत्त्यातून भागवायचा आहे.महापालिकेस पन्नास ई बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत.या बसेससाठी कोंडेश्वर मार्गावरील महापालिकेच्या जागेवर आगार बांधण्यात येत आहे.तथापि वाहनांसाठी चार्जींग स्टेशनसाठी सबस्टेशनची आवश्यकता आहे.त्यासाठी निविदा प्रक्रिा करण्यात आली.पहील्या प्रक्रियेत निविदा न आल्याने दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्यात.त्यामध्ये भारत इन्फ्रा अमरावती यांनी निविदा किंमतीच्या ३.१२ टक्के व एन टी इलेक्ट्रीकल अॅंड इंजिनिअरिंग या संस्थेने ५.४७ टक्के कमी दराने दर दिलेत.तिसरी निविदा धारक कंपनी स्वामी तांत्रिक नागरि सेवा सहकारी संस्थेने निविदेच्या किंमतीइतकेच दर दिलेत.यापैकी कमी दर देणाऱ्या एन.टी.इलेक्ट्रीकल अॅंड इंजिनियरिंगला कंत्राट देण्यास स्थायी समितीने मंजूरी दिली.महापालिकेच्या आरोग्य,सामान्य प्रशासन विभाग, स्वच्छता विभाग यांना ४३५ लाख रूपयांच्या अतिरिक्त अनुदानाच्या मागणीचा प्रस्तावही मंजूर कऱण्यात आला.स्थायी समितीच्या पहील्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक,उपायुक्त योगेश पिठे,नरेंद्र वानखडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख व सोळाही सदस्य उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी