बीड जिल्ह्यात इंधन व गॅसचा पुरेसा साठा – नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये
बीड, 15 मार्च (हिं.स.)।आखाती युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल, डिझेल व एलपीजी
बीड जिल्ह्यात इंधन व गॅसचा पुरेसा साठा – नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये


बीड, 15 मार्च (हिं.स.)।आखाती युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी, सहाय्यक पुरवठा अधिकारी, निरीक्षण अधिकारी तसेच BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांचे प्रतिनिधी व पेट्रोल-डिझेल-गॅस वितरक उपस्थित होते.

सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात सुमारे ३० दिवस पुरेल इतका LPG गॅस साठा उपलब्ध असून पेट्रोल व डिझेलचाही १० दिवसांपेक्षा जास्त साठा उपलब्ध आहे. तसेच संबंधित डेपोमध्येही सुमारे ३० दिवसांचा अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाही.

तसेच गॅस, पेट्रोल किंवा डिझेलच्या नावाखाली अतिरिक्त पैसे आकारणे, साठेबाजी करणे किंवा घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी टंचाईच्या अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी व आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande