पुण्यात ट्रॅफिक बेशिस्तीला लगाम नाही; पोलिसांपुढे मनुष्यबळ यंत्रणेची कमतरता
पुणे, 15 मार्च (हिं.स.)। शहरातील वाहतूक शिस्तीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, दंडही आकारला तरीही रस्त्यांवरील बेशिस्तीला लगाम बसला नाही. दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा अपु
पुण्यात ट्रॅफिक बेशिस्तीला लगाम नाही; पोलिसांपुढे मनुष्यबळ यंत्रणेची कमतरता


पुणे, 15 मार्च (हिं.स.)। शहरातील वाहतूक शिस्तीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, दंडही आकारला तरीही रस्त्यांवरील बेशिस्तीला लगाम बसला नाही. दुसरीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा अपुऱ्या आहेत. वाहतूक पोलिसांकडे अत्याधुनिक यंत्रणा, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही.

एआय आधारित स्मार्ट ट्राफिक प्रणालीचा प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. परिणामी वाहतूक व्यवस्थेवरील ताण वाढत असून, या प्रश्नाकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.पुणे शहरात रस्ते तेच आहेत; पण वाहने अनेक पटींनी वाढली आहेत. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे परिस्थिती अधिकच बिघडत आहे. सिग्नल तोडणे, नो-एंट्रीतून वाहन चालवणे, मद्यसेवन करून वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, ट्रिपल सीट आणि मोबाइलवर बोलत वाहन चालवण्याचे प्रकार रोजचे झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande