बीडमध्ये बलिदानाचा विजय: आप्पा पवारांच्या कुटुंबाला अखेर हक्काची जमीन
बीड, 15 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील तळेवाडी येथे पारधी समाजाचे हक्क मिळवण्यासाठी प्राणांची आहुती देणारे दिवंगत कार्यकर्ते आप्पा भुजा पवार यांच्या प्रदीर्घ संघर्षाला अखेर प्रशासकीय न्यायाची जोड मिळाली आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पवार क
अ


बीड, 15 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील तळेवाडी येथे पारधी समाजाचे हक्क मिळवण्यासाठी प्राणांची आहुती देणारे दिवंगत कार्यकर्ते आप्पा भुजा पवार यांच्या प्रदीर्घ संघर्षाला अखेर प्रशासकीय न्यायाची जोड मिळाली आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पवार कुटुंबाला अधिकृतपणे एक एकर जमिनीचे वाटप करून त्यांच्या पुनर्वसनाची महत्त्वपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली.

२०२३ मध्ये हक्काचे घर आणि मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना आप्पा पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या जमिनीचे हस्तांतरण केले. अनेक वर्षांच्या उपेक्षेनंतर आता पवार कुटुंबाला सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य लाभले आहे. हा निर्णय म्हणजे एका सच्च्या कार्यकर्त्याच्या संघर्षाचा मोठा विजय असून प्रशासनाच्या संवेदनशीलतेमुळे एका गरीब कुटुंबाचा आत्मसन्मान आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यातील प्रगतीचा पाया खऱ्या अर्थाने रचला गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande