
पुणे, 20 मार्च (हिं.स.)।
मध्य-पूर्व आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीने इंधन तेल व नैसर्गिक इंधन वायू पुरवठ्यावर परिणाम झाल्याने उद्भवलेल्या घरघुती गॅस सिलेंडर टंचाईच्या परिस्थितीत ग्रामीण भागात वितरकांकडून घरघुती गॅस पुरवठ्यावर ४५ दिवस बुकिंग कालावधी निश्चित केल्याने या निर्णयाचा परिणाम निमशहरी असलेल्या हवेली तालुक्यात झाला असून,शहरीकरण झालेल्या हवेली तालुक्यात गॅस सिलेंडर बुकिंग मर्यादा ४५ दिवस केल्याने,या भागात नोकरदार वर्ग,शिक्षक,स्थायिक झालेले अकुशल कामगार यांना गॅस सिलेंडर अभावी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती उद्भवली आहे.आखाती देशातील युध्दजन्य परिस्थितीने इंधन व नैसर्गिक वायूचा पुरवठा मंदावला आहे.
या परिस्थितीत राज्यात तसेच जिल्ह्यात गॅस सिलेंडरची वितरण व्यवस्था सुरळीत रहावी म्हणून शहरी भागात २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवसांचा बुकिंग कालावधी निश्चित करुन पुरवठ्याचे आदेश पारीत केले आहेत.त्यामुळे सुमारे ४५ दिवसानंतर ग्रामीण भागातील वितरकांकडून ग्राहकांना सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु