
नांदेड, 24 मार्च (हिं.स.)। मराठासेवा संघ या वैचारिक संघटनेच्या हदगाव तालुकाध्यक्षपदी शाहीर गजानन जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा. रामेश्वर मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, केंद्रीय कार्यकारणी सदस्य शेरा पाटील, विभागीय अध्यक्ष व्ही. टी. शिंदे, नांदेड जिल्हा सहसचिव राम डाखोरे आदी उपस्थित होते. या वेळी मराठा सेवा संघाचे वरिष्ठ पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते अजय चव्हाण, त्रिभुवनदेव चव्हाण आदी उपस्थित होते. १६ वर्षांपासून ग्रामीण भागातील अनेक गावखेड्यात, शाळा व महाविद्यालयांत जाऊन प्रबोधनाच्या माध्यमातून मराठा सेवा संघाच्या विवेकी विचारांचीरुजवण आणि सर्व कक्षांचे कार्य वाढवण्याचे काम अविरतपणे केले जात आहे. महाराष्ट्रात शाहिरीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रबोधनाचे कार्य केल्यामुळे शाहीर गजानन जाधव वाटेगावकर यांची निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis