
बीड, 03 मार्च (हिं.स.)।
अहिल्यानगर-बीड-परळी वैद्यनाथ
तसेच छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव रेल्वे मार्गासंदर्भात पाठपुरवा करण्याचा निर्धार स्वातंत्र्य सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीच्या बैठकीत करण्यात आला. या प्रश्नावर तिन्ही जिल्ह्याचे खासदार बीडचे तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांची भेट घेण्याचे सर्वानुमते ठरले आहे.
समितीचे ज्येष्ठ सदस्य अरुणराव डाके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष जवाहरलाल सारडा, सचिव सुनील क्षीरसागर, शांतीलाल पटेल, विष्णुदास बियाणी, रामचंद्र जोशी,
आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अहिल्यानगर-बीड-परळी वैद्यनाथ या लोहमार्गाच्या विकासकामांवर चर्चा करण्यात आली.तिन्ही जिल्ह्याचे खासदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.
सध्या असलेल्या चालू रेल्वे कामांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांवर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले.
यासोबत धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वे मार्गासाठी कृती समितीने प्रयत्न करण्यासाठी नियोजन करण्यात आले. बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथील खासदारांना देण्याचे ठरले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis