
नवी दिल्ली, 03 मार्च (हिं.स.) : सादाबाद कोतवाली हद्दीतील गढी हरिया गावाजवळ यमुना एक्सप्रेसवेवर 3 मार्च रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास एका खासगी डबल डेकर बसने इको कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इको कारमधील 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस व प्रशासनाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून जखमींना उपचारासाठी खंदौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खासगी डबल डेकर बस दिल्लीहून गोरखपूरकडे जात होती. त्याच वेळी सादाबाद परिसरातील गढी हरिया गावाजवळ यमुना एक्सप्रेसवेवर बसने इको कारला मागून धडक दिली. धडक लागताच कारमधील प्रवाशांमध्ये आरडाओरडा सुरू झाला. काही काळासाठी वाहतूकही विस्कळीत झाली होती. इको कारमधील सर्व प्रवासी दिल्लीहून राजस्थानातील राजाखेडा येथे जात होते.या अपघातात, विजय, पिंकी, नाथू देवी, दिनेश, सुनीता, लोकेश यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तर मनोज, राणी, विरेंद्र, पूनम, आयुष, जयदीप, आर्यन, अंशु आणि प्राची जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी