राज्यात 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, 31 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी 10 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये विविध महत्त्वाच्या विभागांतील पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात
प्रतिकात्मक लोगो


मुंबई, 31 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी 10 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये विविध महत्त्वाच्या विभागांतील पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

यामध्ये विशेष लक्षवेधी बदल म्हणजे अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती. त्या यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या जागी 1993 बॅचचे वरिष्ठ अधिकारी लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रा यापूर्वी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कायम ठेवण्यात आला आहे.

मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि हिवाळी अधिवेशनामुळे प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. मात्र मार्च अखेरीस या बदल्या अपेक्षित होत्या. त्यानुसार 28 मार्च रोजी काही बदल्या झाल्यानंतर आज मोठ्या प्रमाणावर फेरबदल जाहीर करण्यात आले.

प्रमुख बदल्या पुढीलप्रमाणे :-

लोकेश चंद्रा (आयएएस 1993) — मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई

अश्विनी भिडे (आयएएस 1995) — आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका

विकास चंद्र रस्तोगी (आयएएस 1995) — अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग

विनिता वैद सिंघल (आयएएस 1996) — प्रधान सचिव, मृद व जलसंधारण विभाग

परिमल सिंग (आयएएस 2004) — सचिव (कृषी), कृषी व एडीएफ विभाग

तुकाराम मुंढे (आयएएस 2005) — सचिव, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभाग

लहू माळी (आयएएस 2009) — व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड

माणिक गुरसाल (आयएएस S 2009) — सचिव, दिव्यांग कल्याण विभाग

प्रेरणा देशभ्रतार (आयएएस 2010) — आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग

पृथ्वीराज बी. पी. (आयएएस 2014) — आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

या बदल्यांमुळे राज्यातील विविध विभागांमध्ये नवे नेतृत्व निर्माण होणार असून, प्रशासन अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande