भंडारा - शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदराचा मुक्त संचार
भंडारा, 07 मार्च (हिं.स.)। येथील शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदरांचा मुक्त संचार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे
भंडारा - शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदराचा मुक्त संचार


भंडारा, 07 मार्च (हिं.स.)।

येथील शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदरांचा मुक्त संचार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने गंभीर असलेल्या या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भंडारा येथील शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदरांचा अक्षरशः उच्छाद मांडला आहे. रुग्णालयाच्या वॉर्ड परिसरात उंदीर मोकाट फिरताना दिसत आहेत. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या बेडजवळ उंदीर फिरत असल्याचे समोर आले आहे. स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही समस्या वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना दोषी ठरवत कुठेही अन्न फेकत असल्याने रूग्णालयात उंदीर मोठ्या प्रमाणात आहे असे सांगितले. तर दुसरीकडे उंदीर मारण्यासाठी वड्या ठेवल्या जातात असे सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar


 rajesh pande