नाशिकमध्ये मंडळ अधिकारी व पाच तलाठी कार्यालयांचा शुभारंभ
नाशिक, 08 मार्च (हिं.स.) : महसूल विभागाच्या कामकाजाला अधिक गतिमान बनवून नागरिकांना स्थानिक स्तरावर महसूल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहासमोरील धान्य गोदामात मंडळ अधिकारी कार्यालयासह पाच तलाठी कार्यालयांचे कामकाज स
New office opened in Nashik


नाशिक, 08 मार्च (हिं.स.) : महसूल विभागाच्या कामकाजाला अधिक गतिमान बनवून नागरिकांना स्थानिक स्तरावर महसूल सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहासमोरील धान्य गोदामात मंडळ अधिकारी कार्यालयासह पाच तलाठी कार्यालयांचे कामकाज सुरू करण्यात आले.

सदर कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमात आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे, मंडळ अधिकारी अनिल रोकडे तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन समारंभात नागरिकांना विविध महसूल दाखल्यांचे प्रातिनिधीक वितरण करण्यात आले. मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत, शासनाच्या सेवा मिळविण्याचे आवाहन केले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना महसूल विषयक सेवा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होईल तसेच शासकीय कामकाजाची गतीही वाढेल.

सदर कार्यालय सुरू करण्यासाठी उपलब्ध धान्य गोडाऊन इमारतीचा योग्य वापर करून तेथे मंडळ अधिकारी कार्यालयासह पाच तलाठी कार्यालयांचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. यामुळे महसूल प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणपूरक रंग लावून रंगपंचमीचा उत्सवही आनंदात साजरा केला.

----------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande