रत्नागिरी : चिपळूणचे समीर टाकळे भाजपचे जिल्हा चिटणीस
रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर टाकळे यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांच्याव
समीर टाकळे


रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर टाकळे यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

चिपळूणमध्ये शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले समीर टाकळे यांनी महिनाभरापूर्वी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला होता. चिपळूण शहरात ते अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असून अखंड शिवसेनेचे उपशहरप्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. त्यांनी नगरपालिका निवडणूकही लढवली होती. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. सानिका टाकळे यांनीही निवडणूक लढवली होती.उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुरू असलेल्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या संघटनकौशल्याची, काम करण्याच्या पद्धतीची आणि सर्वसामान्यांशी असलेल्या थेट संपर्काची दखल घेत जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांना पक्षात संधी दिली होती.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये समीर टाकळे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande