रत्नागिरी जिल्हा परिषद उबाठा गटनेतेपदी विक्रांत जाधव
रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी विक्रांत भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेत पक्षाचे
विक्रांत जाधव


रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी विक्रांत भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच स्थानिक पातळीवरील विविध विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्याची जबाबदारी विक्रांत जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

श्री. जाधव यांच्या निवडीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून आगामी काळात जिल्हा परिषदेत पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande