रत्नागिरी : खैराच्या झाडांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : निवळी (ता. रत्नागिरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत गस्त घालताना खैराच्या झाडांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या तपासणीदरम्यान बोलेर
खैराची अवैध वाहतूक करणाऱ्यांसह पोलीस पथक


रत्नागिरी, 8 मार्च, (हिं. स.) : निवळी (ता. रत्नागिरी) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत गस्त घालताना खैराच्या झाडांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या तपासणीदरम्यान बोलेरे पिकअप (क्रमांक MH-14-HG-7338) आणि व टाटा योद्धा (क्रमांक MH-08-AP-4339) या दोन चारचाकी वाहनांमध्ये खैराच्या झाडांची लहान-मोठ्या आकारातील १८१ लाकडे विनापरवाना वाहतूक करताना आढळली. या वाहनांवरील चालक अजित गंगाराम चव्हाण (वय 26 वर्षे, रा. आंबडस, ता. खेड, जि. रत्नागिरी) आणि अरबाज हमीद सुर्वे (34 वर्षे, रा. गवळीवाडी, घाणेखुंट, ता. खेड, जि. रत्नागिरी) तसेच अक्षय राजू चव्हाण (28 वर्षे, रा. भिंगळोली, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) खैराची झाडे तोडून आणून चोरी करून त्यांची बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. या झाडे आणि दोन्ही वाहनांसह 11 लाख 71 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande