
अकोला, 15 एप्रिल (हिं.स.)। अकोला महापालिका हे राजकीय आखाडा बनल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.. सत्तेतील दोन पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले आहेत.. दरम्यान विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सागर भारुका यांच्याकडून माझा जीवाला धोका असून आजही माझावर त्याने हमला केल्याचा आरोप केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका यांच्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाले होते.. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली होती.. आज पुन्हा हा वाद चव्हाट्यावर आला आहे. नगरसेवक सागर भारुका यांनी लावलेले अनधिकृत पोस्टर आज प्रशासनाने काढल्याने. अकोला महापालिका परिसरात दोन पदाधिकारी यांच्यात जोरदार राडा झाला आहे.. एकमेकांना शिवीगाळ देखील करण्यात आली तर यावेळीही दोन्ही पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते.. दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याची आज पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळाले.. यावेळी सागर भारुका यांनी आपल्याला विनाकारण शिवीगाळ केल्याचा आरोप विजय अग्रवाल यांनी केला आहे.. तर त्याच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या सभेचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.. विजय अग्रवाल यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस याप्रकरणी नेमकी कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागलं आहे. एकूणच अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण किंवा स्थायी समितीच्या सभेत नेहमी राडा होत असल्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे