अकोला देशात सर्वाधिक उष्ण ; 44.2 अंश तापमानाची नोंद
नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : नागपूरसह संपूर्ण विदर्भात पारा 40 अंशांच्या वर गेला असतानाच अकोला येथे बुधवारी तापमानाने उच्चांक गाठला आहे. अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून येथे 44.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तीव्र उष्णतेमुळे द
हवामान लोगो


नागपूर, 15 एप्रिल (हिं.स.) : नागपूरसह संपूर्ण विदर्भात पारा 40 अंशांच्या वर गेला असतानाच अकोला येथे बुधवारी तापमानाने उच्चांक गाठला आहे. अकोला देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून येथे 44.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

तीव्र उष्णतेमुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळले आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार आंध्र प्रदेशात 43.4 अंश तर उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 43 अंशांपर्यंत तापमान गेले आहे.

विदर्भातील अनेक शहरांमध्येही तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अमरावती येथे 44, वर्धा येथे 43.9 अंश तर नागपूरमध्ये 43.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम येथे 42,6 अंश, यवतमाळ येथे 42,8 अंश, गोंदिया येथे 42 आणि बुलढाणा येथे 42.4 अंश तापमान नोंदवले गेले. भंडारा तुलनेने थंड राहून 41 अंशा पर्यंतच पोहोचला.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातही विदर्भात तीव्र उष्णतेची स्थिती होती. एप्रिल 2025 मध्ये अकोला येथे 44.2 अंश, तर नागपूरमध्ये 44.7 अंश आणि चंद्रपूरमध्ये 45.6 अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली होती. चंद्रपूरने देशातील सर्वाधिक तापमान नोंदवून उष्णतेचा उच्चांक गाठला होता. सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande