
नाशिक, 15 एप्रिल (हिं.स.): शहरात महिला सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेसह विविध सामाजिक मुद्द्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी ‘जनआक्रोश बाईक रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असून सकल हिंदू समाज, नाशिक यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
सकाळी ९:३० वाजता इंदिरानगर येथील अशोक हॉस्पिटल (जॉगिंग ट्रॅक) येथून रॅलीला सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय (सीबीएस) येथे समाप्त होईल. येथे विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले जाणार आहे.
महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षितया रॅलीमध्ये शहरातील अनेक महिला दुचाकींसह सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महिला सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विविध समस्यांवर आवाज उठवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.आयोजकांनी नागरिकांना, विशेषतः महिलांना, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या रॅलीमुळे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून शहरात आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV