
पुणे, 18 एप्रिल (हिं.स.)।
अखिल भारतीय संस्कृती समन्वय संस्थान आणि धर्म जागरण ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मिलिंद ओक लिखित 'ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्माचा सचित्र परिचय' या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी १९ एप्रिलला होणार आहे.
अ.भा. धर्मजागरण समन्वय प्रमुख शरद ढोले यांच्या हस्ते प्रकाशन होईल. हे पुस्तक प्रामुख्याने ख्रिश्चन, इस्लाम आणि हिंदू धर्माचा तुलनात्मक आणि सचित्र परिचय करून देणारे असून, भारताच्या विशेष संदर्भासह याचे लेखन करण्यात आले आहे.
रविवारी १९ एप्रिल ला सायंकाळी ६ वाजता लेडी रमा बाई सभागृह, एसपी कॉलेज, टिळक रोड येथे हा कार्यक्रम होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु