नीब करोली बाबांच्या जीवनावरील चित्रपट येत्या 24 एप्रिलला प्रदर्शित होणार
ठाणे, 18 एप्रिल, (हिं.स.)। विसाव्या शतकातील एक महान संत आणि हनुमानजींचे अनन्य भक्त तथा ''सब एक'' अशी शिकवण देणारे बाबा नीब करोली यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट येत्या 24 एप्रिल रोजी सबंध भारतात प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटाच्या टीमने शुक्रवारी ठ
ठाणे


ठाणे, 18 एप्रिल, (हिं.स.)। विसाव्या शतकातील एक महान संत आणि हनुमानजींचे अनन्य भक्त तथा 'सब एक' अशी शिकवण देणारे बाबा नीब करोली यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट येत्या 24 एप्रिल रोजी सबंध भारतात प्रसिद्ध होत आहे. या चित्रपटाच्या टीमने शुक्रवारी ठाण्यातील लोकपूरम येथील श्री बाबा नीम करोली धाममध्ये येऊन बाबांचे दर्शन घेतले. या प्रसंगी बाबांची भूमिका करणारे सुबोध भावे यांनी, या भूमिकेतून आपणाला जीवन जगण्याचा साक्षात्कार झाला, असे सांगितले.

लोकपूरम येथे डाॅ. संगिता आनंद, लावण्या पाटील आणि हर्ष पाटील यांनी महाराष्ट्रातील पहिले श्री बाबा नीब करोली यांचे धाम स्थापन केले आहे. अतिशय जागृत देवस्थान म्हणून या धामची ख्याती सबंध राज्यभर पसरली आहे. या धाममध्ये श्री बाबा नीब करोली महाराज या चित्रपटाचे दिग्दर्शक शरदसिंह ठाकूर, कार्तिक मल्हार, अभिनेते सुबोध भावे, समीक्षा भटनागर, आरती नागपाल, वर्षा माणिकचंद यांनी बाबा नीब करोली यांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मनोज प्रधान हेदेखील उपस्थित होते.

या प्रसंगी सुबोध भावे यांनी, आपणाला ही भूमिका करण्याची संधी मिळणे म्हणजे बाबांचे आशीर्वाद लाभल्यासारखे आहे. बाबांनी भक्तांना जीवनप्रकाश दिला आहे. चमत्काराच्या पलिकडे जो साक्षात्कार असतो, तो आपणाला लाभला आहे. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम ही शिकवण देणाऱ्या बाबांची भूमिका करणे हे आपले भाग्य आहे, असे सांगितले. तर अभिनेत्री आरती नागपाल यांनी हा सिनेमा सर्वांनीच पहावा, असे आवाहन केले.

दरम्यान, रिगल प्लाझा, लोकपूरम येथील बाबा नीब करोली यांच्या धाममध्ये आत्मिक शांती तर लाभतेच; शिवाय, जगण्याचा मार्ग गवसतो, असे धाम संचालिका डाॅ. संगिता आनंद यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande