
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.)। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणात राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई, पीडित कुटुंबाला सुरक्षा आणि घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हाथरस, कठुआ, उन्नाव आणि आता गाझीपूर येथील घटनांना एक पॅटर्न असल्याचे सांगत म्हटले की, प्रत्येक वेळी पीडिता दलित, मागासवर्गीय, आदिवासी किंवा गरीब असते आणि गुन्हेगारांना संरक्षण मिळते. त्यांनी मणिपूरमधील घटनेचाही उल्लेख केला.
राहुल गांधी यांनी आरोप केला की सत्ताधारी प्रत्येक वेळी गप्प राहतात आणि ज्यांच्याकडून बोलण्याची अपेक्षा असते ते मौन बाळगतात. ज्या देशात आई-वडिलांना आपल्या मुलीची एफआयआर नोंदवण्यासाठी भीक मागावी लागते, त्या सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule