
नाशिक, 30 एप्रिल, (हिं.स.)। लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सव्वाचार वर्षे - लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देऊन तिच्या मोपेडचा - अपहार करणाऱ्या तरुणाविरुद्ध - गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली व माहिती अशी, की फिर्यादी - अल्पवयीन मुलगी ही सातपूर न परिसरात राहते. आरोपी हर्षल
भारत ठोके (वय २२, रा. सोमेश्वर कॉलनी, सातपूर) याने पीडित अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून दि. १३ जून २०२२ ते दि. १३ एप्रिल २०२६ या कालावधीत पीडितेला बळजबरीने सोमेश्वर कॉलनी, त्र्यंबक रोडवरील हॉटेल पांडव, वासाळी येथील मधुर मिलन लॉज, हॉटेल एअरपोर्ट व इतर ठिकाणी नेऊन वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने लग्नाबाबत विचारले असता ठोके याने लग्नास नकार देऊन तिला मारहाण करीत धमकी दिली, तसेच पीडितेची ५० हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा मोपेड परत करण्यास नकार देऊन तिच्या दुचाकीचा अपहार केला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात हर्षल ठोकेविरुद्ध पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV