
डोंबिवली, 30 एप्रिल (हिं.स.)।
एमआयडीसी, मिलापनगर मध्ये काही महिला या पहाटे येऊन भंगार, कचरा गोळा करण्याच्या नावाखाली चोऱ्या करीत आहेत. सदर महिला या बंगले, इमारतीचा आवारात जाऊन लोखंडी, अल्युमिनियम, प्लास्टिक वस्तू, कचऱ्याचे डबे इत्यादी उचलून घेऊन जात असतात. या महिलांना कोणी हटकले तरी त्यांना या महिला दाद देत नाहीत. महिला असल्याने आणि पहाटेची वेळ असल्याने त्यांना पकडण्यात अडचणी येत असल्याने त्यांचा हा चोरीचा उद्योग राजरोसपणे चालू आहे.
या चोरट्या महिलांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल येथील काही जागरूक नागरिकांनी मानपाडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांना सीसी कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्य पाठवून कळविले आहे आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi