अल्पवयीन मुलीशी लग्न करून अत्याचार; आरोपीला अटक
रायगड, 30 एप्रिल (हिं.स.) I दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना मौजे हमरापुर, ता. पेण येथे उघडकीस आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित
पोसई/एकनाथ सकपाळ हे करीत आहेत.


रायगड, 30 एप्रिल (हिं.स.) I

दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना मौजे हमरापुर, ता. पेण येथे उघडकीस आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असतानाही तिच्याशी दुर्गामाता मंदिरात विवाह केला. त्यानंतर वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. प्रकृती बिघडल्याने तिला सिव्हील हॉस्पिटल अलिबाग येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. आरोपीस दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:४० वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९/२०२६ नोंदविण्यात आला असून, बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (POCSO) अधिनियम 2012 अंतर्गत कलम ४, ५(ज)(२), ५(एल), ६ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(आय)(एम) आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 च्या कलम ९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोसई/एकनाथ सकपाळ हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande