अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी - गहिनीनाथ महाराज औसेकर
पुणे, 08 एप्रिल, (हिं.स.)। पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री डॉ. मुग्धा कर्णिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. वारकरी संप्रदाय, संत परंपरा तसेच श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. डॉ. कर्णिक या
vithal rukamini


पुणे, 08 एप्रिल, (हिं.स.)। पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री डॉ. मुग्धा कर्णिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. वारकरी संप्रदाय, संत परंपरा तसेच श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. डॉ. कर्णिक यांच्या या वक्तव्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात मंदिर समितीने पत्रक प्रसिद्ध केले आहे.

वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षांपासून समाजात समता, प्रेम, शांतता आणि आध्यात्मिकतेचा संदेश दिला आहे. संतांच्या शिकवणीमुळे समाजात सद्भावना व नैतिक मूल्यांची जपणूक झाली आहे. असे असताना अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी संत परंपरा, धार्मिक श्रद्धा व वारकरी संप्रदायाच्या आचार-विचारांविषयी केलेली विधाने समाजात संभ्रम निर्माण करणारी, वारकरी भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचविणारी आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करुन यासंदर्भात मंदिर समितीने पत्रकही प्रसिद्ध केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande