खा. रामराव वडकुते यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जालना जिल्हा कार्यालयात आढावा बैठक
जालना, 13 मे (हिं.स.)। पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभ्यास वर्ग तसेच एस.आर.आय. संदर्भात राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जालना जिल्हा कार्यालय येथे आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत आगामी प्रशिक्षण
अ


जालना, 13 मे (हिं.स.)।

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभ्यास वर्ग तसेच एस.आर.आय. संदर्भात राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जालना जिल्हा कार्यालय येथे आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

बैठकीत आगामी प्रशिक्षण वर्गाचे नियोजन, संघटनात्मक बळकटीकरण तसेच एस.आर.आय. संदर्भातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार मांडून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक सूचना केल्या. भाजपा संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर , माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार विलास बापू खरात, देविदास कुचे, बद्रीभाऊ पठाडे, अनिलराव कोलते तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande